अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही मी अत्यंत दुर्मीळ असं, ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने जगले…

स्वतःच्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजणं, कमालीचा संयम या सर्व घटकांनाच जगण्याचा आधार बनवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने; धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. माझं लिखाण, संशोधन वगैरेंची सभोवतालच्या प्रस्थापित समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा मला सार्थ असा अभिमान आहे. प्रयत्नपूर्वक शाबूत ठेवलेला आत्मसन्मान नि संवेदनशीलता मी मरू दिली नाही.......